Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीभारत जोडो यात्रा दिल्लीत; लाल किल्ल्यावरून धडाडणार राहुल गांधींची तोफ

भारत जोडो यात्रा दिल्लीत; लाल किल्ल्यावरून धडाडणार राहुल गांधींची तोफ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेल्या या पदयात्रेतील दिल्ली हे दहावे राज्य असून आज या यात्रेचा १०८ वा दिवस आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर जाईल आणि तिथेच राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.

यावेळी मोठ्या संख्येने पादचारी आणि वाहने सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनीही लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण करून विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल. तिथे राहुल गांधी यांची तोफ धडाडणार आहे. दिल्ली काँग्रेसनं भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -