Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद



अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.

उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पारा उणे 5 अंशांवर गेला आहे. दरम्यान, सद्यस्थिती पाहता पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तिथे देशात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईसुद्धा या हिवाळ्याचा सामना करताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी मुंबई आणि नजीकच्या परिसरावर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, अनेकांचे ठेवणीतले स्वेटर आणि लोकरी कपडे आता हळुहळू बाहेर येऊ लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -