Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनमनोरंजन विश्वात शोककळा, आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

मनोरंजन विश्वात शोककळा, आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचे निधन



काल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘अली बाबा दास्तान-ए-कबुल’ मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं आत्महत्य केली. तर आज लगेच मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे आज 25 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. चलपती राव यांना हृदयविकाराच्या झटका आला होता. चलपती राव हे 78 वर्षांचे होते. त्यांचा अचानक मृत्यु झाल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्काबसला आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.



चलपती राव यांच्या निधनाची माहिती वामसी शेखर नावाच्या एका मीडिया पर्सनॅलिटीनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. चलपती हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चलपती यांच्या कुटुंबाच्या दु: खात असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी चलपती यांच्या आत्म्याला शांती मिळो असे देखील म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -