राज्यात तलाठी पदाच्या तब्बल 4122 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य सरकारने नुकतीच या नोकरभरतीची घोषणा केली होती. जिल्ह्यानिहाय व झोनप्रमाणे तलाठी पदासाठी भरती होणार असून, रिक्त जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, हे जाणून घेऊ या..
नाशिक विभाग – 1035 जागा
नाशिक- 252
धुळे – 233
नंदुरबार – 40
जळगाव – 198
अहमदनगर – 312
औरंगाबाद विभाग – 847 जागा
औरंगाबाद – 157
जालना- 95
परभणी – 84
हिंगोली – 68
नांदेड – 119
लातूर – 50
बीड – 164
उस्मानाबाद – 110
कोकण विभाग – 731 जागा
मुंबई शहर – 19
मुंबई उपनगर – 39
ठाणे – 83
पालघर – 157
रायगड – 172
रत्नागिरी- 142
सिंधुदूर्ग – 119
नागपूर विभाग – 580 जागा
नागपूर – 125
वर्धा – 63
भंडारा – 47
गोंदिया – 60
चंद्रपूर – 151
गडचिरोली – 134
अमरावती विभाग – 183 जागा
अमरावती – 46
अकोला – 19
यवतमाळ – 77
वाशिम – 10
बुलढाणा – 31
पुणे विभाग – 746 जागा
पुणे – 339
सातारा – 77
सांगली – 90
सोलापूर – 174
कोल्हापूर – 66
पात्रता
संबंधित पदांनुसार बारावी व ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं असावं.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी- शर्थी उमेदवारांनी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.