Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीसर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार; आमदाराच्या दाव्याने...

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार; आमदाराच्या दाव्याने खळबळ

शिंदे गटाने काल मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता अमरावतीचे आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेतील. उद्धव ठाकरे स्वत: त्यांना शिवसेना भवनाची चावी देतील, असा दावाच रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राणा यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

उद्धव ठाकरेंचे नगरसेवक महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसात बसून टक्केवारीचं राजकारण करत होते. शिवसेनेच्या कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. महापालिकेवर प्रशासक आहे. नगरसेवकांचं नगरसेवकपद राहिलेलं नाही. असं असतानाही कार्यालयात बसून टक्केवारीचं काम केलं जात होतं.

त्यामुळे ते मोडून काढण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील लावण्यात आलं. त्यामुळे टक्केवारीचा धंदा बंद होईल, असा दावा रवी राणा यांनी केला.

येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले पाहिजे. शिंदे यांच्याकडे शिवसेना भवन येईल आणि ते ताब्यात घेतील. शिवसेना भवन लिगली शिंदे गटालाच मिळेल. बहुमत शिंदेंकडे आहे. त्यामुळे सेना भवन शिंदेंना मिळेल. उद्धव ठाकरे यांनाच शिंदे यांना चावी द्यावी लागणार आहे, असा दावाही राणा यांनी केला.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिलेले नाहीत. ते सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा विचार अंगीकारून बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सारखा बाळासाहेबांच्या विचारांचा खरा शिवसैनिक बाहेर आला आहे, असं ते म्हणाले.

शिवसेना भवन हे पक्षाच्या नावाने आहे. जेव्हा पक्षाचे बहुमत ज्याकडे असते त्याच्याकडे पक्षाचा ताबा मिळतो. शिंदे यांच्याकडे 80 ते 90 टक्के पक्ष आहे. शिंदेंनी ते सिद्धही केलं आहे. 40 आमदार शिंदे गटात आले आहेत. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांना शिवसेना भवन मिळण्यात काहीच अडचण नाही, असा दावाही त्यांनी केला.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून येतील. 80 ते 90 टक्के माजी नगरसेवक शिंदेकडे येतील. आणि शिंदेंचा झेंडा महापालिकेवर फडकेल, असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -