Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगलग्नासाठी कशी मुलगी हवी? राहुल गांधींनी पहिल्यांदाच सांगितली ‘दिल कि बात’

लग्नासाठी कशी मुलगी हवी? राहुल गांधींनी पहिल्यांदाच सांगितली ‘दिल कि बात’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वय सध्या 52 वर्ष असून अजूनही त्यांनी लग्न केलेले नाही. राहुल गांधी लग्न कधी करणार ? असा प्रश्न नेहमीच त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो . त्यातच आता राहुल गांधींनी आपल्या लग्नाबाबत प्रथमच मौन सोडलं असून त्यांना नेमकी कशी मुलगी पाहिजे याबाबत खुलासा केला आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान, एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत उलगडा केला आहे. यावेळी राहुल गांधींना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. ती माझी दुसरी आई होती.” इंदिरा गांधींसारखे गुण असलेल्या कोणाशी लग्न करायचे आहे का, असे विचारले मला अशी मुलगी हवी आहे जिच्यात माझ्या आजी आणि आईचे गुण मिसळलेले असतील असं उत्तर राहुल गांधींनी दिले.

दरम्यान, विरोधकांकडून राहुल गांधींवर वेगवेगळ्या नावांनी टीका केली होते यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला त्याची पर्वा नाही. कोणी मला ‘पप्पू’ म्हणतो तेव्हा मला वाईट वाटत नाही, कारण हा सगळा प्रचाराचा भाग आहे आणि जे असे बोलतात ते स्वतःच घाबरलेले असतात. मात्र मी कोणाचाही द्वेष करत नाही असं राहुल गांधींनी म्हंटल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -