Tuesday, July 29, 2025
HomeमनोरंजनBig News: ''Akshay Kumar ने माझा वापर केला''?..बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Big News: ”Akshay Kumar ने माझा वापर केला”?..बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

एखाद्या सिनेमात एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडणारे बरेच सेलिब्रिटी आपण पहिले असतील. यातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले पण काहींच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत झाला.

बॉलिवूडमध्ये 80 आणि 90 च दशक गाजवणारी एक जोडी म्हणजे रविना टंडन आणि अक्षय कुमार ‘मोहरा’ या सिनेमातून दोघांनी एकत्र काम केलं आणि चित्रपटादरम्यान दोघांमधली लव्ह स्टोरी फुलू लागली, मात्र त्या नंतर दोघांच्या नात्यात भयंकर दुरावा आला आणि त्याहीपेक्षा सगळ्यांना धक्का बसला ते, रवीनाने नातं संपल्याचं कारण जेव्हा कॅमेऱ्यासमोर सांगितलं..

रविना आणि अक्षय एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते अगदी दोघे एकमेकांशी लग्न करणार अशाही चर्चा होऊ लागल्या होत्या ,रवीना ने अक्षयला पहिल्यांदा करण्यापासून ते अगदी दोघेजण बेडरूम शेअर करतानाच्या बऱ्याच अफवा होत्या .

रविनाने सांगितले होते की, अक्षयने एकावेळी 3-3 मुलींना डेट केले होते. त्याने रवीनाशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र नंतर अक्षयच्या अफेअरच्या बातमीने नाराज होऊन तिने हे नाते तोडले.

तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर एका मंदिरात त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, 1996 मध्ये ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटापासून त्यांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली. अक्षय आणि रेखा यांच्यामध्ये वाढती जवळीक यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं.

रवीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, अक्षय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना शिल्पा शेट्टीला डेट करत होता. अक्षयने फसवणूक केल्याचे रवीनाने म्हटले होते. तिच्या मित्रांनी आधीच अभिनेत्रीला अक्षयपासून दूर राहण्यास सांगितले होते.

रवीना अक्षयवर इतकी चिडली होती की तिने मीडियामध्ये अक्षयबद्दल असेही म्हटले होते की ‘खिलाडी कुमार’ला ‘प्रत्येक सुंदर मुलीला’ प्रपोज करण्याची सवय आहे. एवढेच नाही तर एका फॅशन मॅगझिनला मुलाखत देताना ती म्हणाली होती की, ‘अक्षयकडे सर्व काही आहे, फक्त निष्ठा नाहीये.

असे मानले जाते की रवीनाच्या अशा मुलाखतीमुळे अक्षय आणि रवीना यांच्यातील नातं कायमचं ठप्प झालं. काही वर्षांनी अक्षय कुमारने अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. तर रवीनाने बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्नगाठ बांधली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -