Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील १३ जिल्ह्यांत थंडीचा प्रकोप, 'हॉट सीटी'चे तापमान सर्वात कमी

राज्यातील १३ जिल्ह्यांत थंडीचा प्रकोप, ‘हॉट सीटी’चे तापमान सर्वात कमी

राज्यात थंडीचा कडका सुरु आहे. सर्वात हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमान सर्वाधिक घसरण झालीय.काश्मिरामध्ये सुरु असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यासह देशात थंडीचा प्रकोप सुरु आहे.

मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात १९ जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे आयएमडीने म्हटलंय.

कुठे किती तापमान

ओझर ४.७ । निफाड ५.० । जळगाव ५.० । धुळे ५.० । गोंदिया ७.०

देशात थंडी वाढणार
उत्तर भारतातील काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच राजस्थानात चांगली थंडी आहे. तापमानात घसरण झाल्याने आणि दाट धुके पसरले आहे. त्याचा परिणाम रेल्वे व विमानसेवेवर होत आहे. IMD ने देशभरात पुढील तीन दिवस तापमानात घसरण कायम राहणार असल्याचं म्हटलंय. मध्य प्रदेशात तापमान दोन ते तीन डिग्री घसरणार आहे. राजस्थान, हरियाणा, चंडीगढमध्ये 8 शीतलहर कायम असणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तरी राजस्थान, बिहार, सिक्किम, त्रिपुरामध्ये आणखी तीन दिवस धुके कायम असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -