Thursday, July 31, 2025
Homeक्रीडाIND vs SL: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, कोण कोणावर भारी?

IND vs SL: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, कोण कोणावर भारी?

T20 सीरीजनंतर टीम इंडिया आणि श्रीलंकमध्ये आजपासून वनडे सीरीज सुरु होत आहे. तीन सामन्यांच्या वनडे सीरीजला आजपासून गुवाहाटीमधून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने टी 20 सीरीज जिंकली. आता वनडे मालिका जिंकण्याचाही टीम इंडियाचा प्रयत्न असेल. वनडे टीममध्ये बदल दिसणार आहे. टी 20 मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली होती. वनडे सीरीजमध्ये दिग्गज खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि केएल राहुल वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे टीम इंडिया आणखी बळकट झाली आहे.

टीम इंडियासमोर मोठं आव्हान

श्रीलंकन टीमने T20 सीरीजमध्ये टीम इंडियाला चांगली टक्कर दिली होती. आता दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन टीम वनडे सीरीजमध्ये सुद्धा टीम इंडियासमोर मोठं आव्हान निर्माण करु शकते. टीम इंडिया श्रीलंकेला कमजोर समजण्याची चूक करणार नाही. याय टीमने आशिया चषकाच जेतेपद पटकावलं होतं.

आकड्यांचा खेळ काय सांगतो?

या सीरीजआधी आतापर्यंत दोन्ही टीम्समध्य खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांवर नजर टाकली, तर आकडे यजमान भारताच्या बाजूने आहेत. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत एकूण 162 वनडे सामने झालेत. यात 93 सामने भारताने, तर श्रीलंकन टीमने 57 मॅचेसमध्ये विजय मिळवलाय. 11 सामन्यांचा कुठलाही निकाल लागला नाही. एक मॅच टाय झाली.

भारताची बाजू वरचढ

भारताने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या वनडे सामन्यांबद्दल बोलायच झाल्यास, श्रीलंकेविरुद्ध 36 सामन्यात विजय मिळवलाय. श्रीलंकेने भारतात फक्त 12 सामने जिंकलेत. आकड्याच्या दृष्टीने भारताची बाजू पूर्णपणे वरचढ आहे.

भारत आणि श्रीलंकेमध्ये शेवटची वनडे सीरीज जुलै 2021 मध्ये झाली होती. श्रीलंकेत ही वनडे सीरीज झाली होती. त्यावेळी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. दोन्ही टीम्समधील मागच्या पाच सामन्यातील आकडे पाहिल्यास, भारताची बाजू वरचढ आहे. श्रीलंकेची टीम मागच्या पाच सामन्यात फक्त एक वनडे मॅच जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -