Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनएकीकडे पठाणचा वाद दुसरीकडे ट्रेलरचा धमाका; रिलीज होताच अवघ्या वीस मिनिटांतच नवा...

एकीकडे पठाणचा वाद दुसरीकडे ट्रेलरचा धमाका; रिलीज होताच अवघ्या वीस मिनिटांतच नवा रेकॉर्ड

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पठाण’ चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे.या चित्रपटातुन शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या सिनेमाची आवर्जून वाट पाहत आहेत. या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे त्याच्यावर बॉयकॉट करण्याची मागणी केली जात असतानाच मात्र आता सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे.

या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. नक्की काय आहे ट्रेलरमध्ये जाणून घ्या. संपूर्ण ट्रेलरमध्ये शाहरुखचा बोलबाला आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

अॅक्शन आणि रोमान्सने पठाण चा ट्रेलर भरलेला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळतेय. या दोघांशिवाय जॉन अब्राहमचा रॉकिंग रावडी अंदाज ट्रेलर मध्ये दिसून येतोय.

ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम हा व्हिलन तर शाहरुख आणि दीपिका हे दोघे देशाच्या रक्षणासाठी लढणारे सैनिक दाखवले आहेत. दोघेही एका मिशनवर सोबत आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शनच्या जोडीला खतरनाक व्हीएफक्स आणि स्टंट देखील पाहायला मिळणार आहेत. एकूणच रोमान्स, कॉमेडी, ॲक्शन असा संपूर्ण मसाला पठाण च्या ट्रेलरमध्ये दिसतोय.

ट्रेलरमध्ये स्टंट सीन्स आकर्षित करत आहेत. याशिवाय डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांची स्टाइलही भाव खाऊन जात आहे. या ट्रेलरची उत्सुकता सर्वांना असल्याने अल्पावधीतच हा ट्रेलर लाखों लोकांपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या वीस मिनिटातच ट्रेलरला १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -