एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री ही बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र, आंबेडकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.