Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरात सर्किट बेंचसाठी सदाभाऊंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूरात सर्किट बेंचसाठी सदाभाऊंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांकरिता “कोल्हापूर” येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यानुसार न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवून कोल्हापूरात सर्किट बँक स्थापन करण्यासाठी विनंती केली होती. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत सकारात्मक ठराव देखील झाला आहे. परंतु यावर अद्याप याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.

या विषयाच्या अनुषंगाने “मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती”च्या शिष्टमंडळाने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन याबाबत सरकारकडे आपला हा प्रश्न मांडण्याकरता विनंती केली होती. त्यानुसार आज माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री यांनी आपलं सरकार याबाबत सकारात्मक असून “मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती” समवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -