Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाकेएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली!

केएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली!

भारतीय फलंदाज केएल राहुल लवकरच अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. काही मीडिया रिपोर्टमधून दावा केला जात आहे, दोघं २३ जानेवारी रोजी लग्न करणार आहे.२३ जानेवारी रोजी टीम इंडिया न्यूझीलँडविरोधात मालिका खेळत असेल. मात्र, न्यूझीलँड विरुद्ध टीम इंडियाच्या संघात केएल राहुल नसणार. त्याने बीसीसीआयला कौटुंबिक कारण देत सुटी मागणी आहे.

बीसीसीआयने देखील ट्विट करत माहिती दिली होती. यामुळे केएल राहुलच्या लग्नाच्या वृत्तावरून सोशल मीडियावर चर्चाला उधाण आलं आहे.

काही रिपोर्टमधून दावा केला जात आहे की, केएल राहुल आणि अथियाचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात होईल. अथिया सुनिल शेट्टीची एकुलती एक लेक आहे. सुनील शेट्टीने गेल्या वर्षीच मुलीचे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नानंतर मुंबईच्या वांद्रे येथील घरात राहणार आहे. वांद्रे येथील कार्टर रोड जवळील एका अपार्टमेंटमध्ये सी-फेस 4 बीएचके प्लॅट असणार आहे. याचे महिन्याचे भाडे १० लाख रुपये असणार आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथिया आयपीएल आणि टीम इंडियाच्या सामन्यात केएल राहुलला चिअर्स करताना दिसायची. राहुलची जर्मनीत शस्त्रक्रिया झाली, तेव्हा त्याच्यासोबत अथिया देखील होती. दोघे जोडीने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -