Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरमहिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ, एकावर ॲट्रॉसिटी गुन्हा

महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ, एकावर ॲट्रॉसिटी गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायतीच्या पहिल्याच बैठकीत तुला मी सरपंच केले आहे, तुमची लायकी नाही, तूम्ही कमी जातीचे आहात, अशी जातीवाचक शिवीगाळ करत तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात एकुंडी गावच्या सरपंच निकिता सुरेश कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पिरगोंडा शिवपुत्र कोट्टलगी (रा. एकुंडी, ता. जत ) याच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. या अनुषंगाने गावच्या विकासाच्या नियोजनासाठी सरपंच निकिता कांबळे यांनी पहिलीच बैठक ग्रामपंचायत येथे बोलावली होती. ही बैठक सुरु असताना संशयित आरोपी पिरगोंडा कोट्टलगी मोबाईलमध्ये सभेचे चित्रीकरण करू लागला. दरम्यान, उपसरपंच रमेश कोरे यांनी ते बंद करा, शांत बसा, अशा सूचना केल्या. यावर कोट्टलगी याने त्यांच्या सोबत वाद घातला. तुम्ही सर्व ग्रामसेवकांचे गुलाम होऊन काम करू नका, आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. असे म्हणतं चित्रीकरण सुरूच ठेवले. यावर सरपंच निकिता कांबळे यांनी त्यांना पुन्हा यावर शांत राहण्यास विनंती केली.

मात्र, कोट्टलगी याने वाद निर्माण करत सरपंच निकिता कांबळे यांना मी तुम्हाला सरपंच पदावर बसवले आहे. तुमची लायकी नाही, तुम्ही खालच्या जातीचे आहात, अशी जातीवाचक शिवीगाळ जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी जतच्या प्रभ विभागीय पोलिस अधिकारी शेंडगे या तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -