Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरलोकल ; उघड्यावरच गणेश मूर्त्या ठेवून जाणाऱ्यांना नागरिकांनी रोखले; कारवाईची मागणी

लोकल ; उघड्यावरच गणेश मूर्त्या ठेवून जाणाऱ्यांना नागरिकांनी रोखले; कारवाईची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम
शेंडा पार्क येथे रविवारी सकाळी गवतात गणपतीच्या मूर्त्या ठेवून
जाणाऱ्यांना मूर्त्या पुन्हा टेम्पोमध्ये भरून घेऊन जाण्यास पाचगाव ग्रामपंचायत सदस्यांनी भाग पाडल्याची घटना घडली. कोल्हापूरातील शेंडा पार्कात टेम्पो मधून गणपती मूर्ती आणून त्या गवतात लपवून ठेवून काहीजण निघून जात होते. हे समजताच पाचगाव ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी पोहोचून चांगलीच कान उघडणी करून गवतात ठेवलेल्या मूर्ती पुन्हा त्यांना टेम्पो भरून घेण्यास भाग पाडले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. मूर्ती उघड्यावरच गवतात ठेवून जाणाऱ्यांना राजारामपुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

कोल्हापूर शहरातील हॉटेल चालकासह काही नागरिक शेंडा पार्क परिसरात कचरा टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात सर्वत्र कचरा पसरला आहे. कित्येक दिवसांपासून महानगरपालिकेनेही येथील कचऱ्याचा उठाव केलेला नाही. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. हा कचरा तातडीने महानगरपालिकेने हटवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

शेंडा पार्क येथे उघड्यावरच गणेश मूर्ती ठेवून जाणाऱ्यांमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. मूर्ती उघड्यावरच ठेवून ग्रामस्थांच्या भावना दुखावणाऱ्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -