Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनगदर 2 चित्रपटासाठी सनी-अमिषाने घेतले एवढे मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!

गदर 2 चित्रपटासाठी सनी-अमिषाने घेतले एवढे मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. ते त्यांच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत.बऱ्याच कालावधीनंतर गदर चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर- 2’ सिनेमासाठी प्रेक्षक आणि निर्मात्यांची पहिली निवड सनी आणि अमिषा होते.

या दोघांना या चित्रपटासाठी कास्ट करण्यासाठी निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ‘गदर- 2’ साठी सनी आणि अमिषा यांनी कोट्यवधी रुपये मानधन घेतले आहे. गदरमधील सनी आणि अमिषाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढच्या पार्टमध्ये निर्मात्यांनी सनी आणि अमिषा यांची निवड केली.

या चित्रपटासाठी सनी देओलने 5 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर अमिषाने 2 कोटी रुपये मानधन घेतले आहे. सध्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आता गदर प्रमाणे गदर 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात किती यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -