Saturday, July 27, 2024
Homenewsॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची यांची घोषणा

ॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची यांची घोषणा


गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटलं की, मी आता आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी.ॲम्ब्युलन्सवर आताचा कर्कश हॉर्न नको, असं त्यांनी म्हटलं आहे.


तुमच्या वाहनांमध्ये आता भारतीय वाद्यांचे आवाज, नवे हॉर्न लवकरच बनणार


गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सांगितलं होतं. तुमच्या गाड्यांमध्ये आता कर्कश आवाजांच्या हॉर्नपेक्षा मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं होतं.
केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात म्हणाले की, पुण्यात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुण्यातील एअरपोर्टसाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगडच्या आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळालीय. पुण्यातील नदी प्रकल्पालाही मंजुरी मिळालीय. पुण्यातही नागपुरप्रमाणे वाघोली ते शिरुर हा रस्ता पन्नास हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार. हा रस्ता तीनमजली असेल. हे काम तीन मजल्याचे असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे, राज्याने त्यासाठी जी एस टी माफ करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.


ते म्हणाले की, मुंबईत नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य सरकार सोबत लवकरच बैठक घेणार आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते बारामती अशा ज्या ज्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे आहे तिथे मेट्रो चालवता येईल. याचे तिकिट रेल्वेच्या तिकीटाएवढे राहील. या मेट्रोला दोन मिलगाडीचे डबे असतील. ज्यामधून दुध, फळे यांची वाहतूक होईल. ही मेट्रो खाजगी व्यवसायिकांना चालविण्यास द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.


गडकरी म्हणाले की, अजित पवारांनी ठरवलं तर पुण्याला सर्व प्रकारच्या प्रदूषणातुन मुक्त करु शकतात. पुणे- बंगलोर एक्स्प्रेस वे चाळीस हजार कोटी खर्च करून बांधणार आहोत. या एक्स्प्रेस वे च्या शेजारी नवीन पुणे वसवावे, असंही ते म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय
गडकरी म्हणाले की, माझ्या आयुष्यात पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय. मी राजीव बजाज यांना सांगितल की जोपर्यंत तुम्ही इथेनॉलवर चालणारी गाडी तयार करत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका. त्यांनी तशी गाडी तयार केली. मी तीन ते चार महिन्यांत ऑर्डर काढतोय की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील, असं गडकरी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -