Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीबरं झालं गद्दार गेले, म्हणून तर हिरे सापडले; ठाकरेंची फटकेबाजी

बरं झालं गद्दार गेले, म्हणून तर हिरे सापडले; ठाकरेंची फटकेबाजी

नाशिक येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते अद्वय हिरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हिरे यांच्या प्रवेशानंतर भाजपला मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. बरं झालं गद्दार गेले, म्हणून तर हिरे सापडले, अशी टीका ठाकरेंनी केली.

मुंबईत शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप नेते अद्वय हिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी स्वाद साधला. ते म्हणाले की,यावेळी संजय राऊत म्हणाले, अद्वय हिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना आणखी दोन पावले पुढे चालेल. हिरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला फायदा होईल. शिवसेना संकटात असताना आपण पक्षात प्रवेश केलात, याला जास्त महत्त्व असल्याचं संजय राऊत म्हणाले. आजच्या संकटात शिवसेनेचा तुम्ही हात पकडलाय, तो तुम्ही पकडा आणि आम्ही सोडणार नाहीत.

आम्ही हे पंचवीस ते तीस वर्षं हे भोगले आहे. त्यांना पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पाम मिरवणूका काढल्यानंतर, उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागले कि हे कायमचे आपले भोई आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -