जत तालुक्यातील खोजानवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता खोजानवाडी येथे घडली.
सदर महिला शिक्षिका ही जिल्हा परीषदवर गेली 25 वर्षे पासुन शिक्षक म्हणुन नोकरीस असुन, गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परीषद प्राथमिक मराठी शाळा, खोजनवाडी येथे शिक्षक म्हणून काम करीत आहेत. सध्या त्यांच्याकडे गेले तीन वर्षापासून प्रभारी मुख्याध्यापक कार्यभार आहे. पूर्वीचे मुख्याध्यापक जयश्री हेडगे यांची बदली झाल्याने तिच्याकडे प्रभारी मुख्याध्यापकचा चार्ज आहे. शाळेत तुकाराम सांळुखे, अर्जुन महादेव माळी, उमेश कोळी, दिनेश चव्हाण असे शिक्षक काम पाहत आहेत.
दि.24 जानेवारी रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांचेकडील पत्राअन्वये त्यांच्याकडे असलेला मुख्याध्यापकाचा चार्ज शिक्षक बाळु तुकाराम सांळुखे यांचेकडे तात्काळ हस्तांतरित करून अहवाल सादर करणेचे पत्र दिले होते.
26 जानेवारी रोजी सकाळी 08.15वा चे सुमारास शाळेतील झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपवुन 09.15वा महिला शिक्षिका कार्यालयात मध्ये एकटीच बसली असता त्यावेळी आमचे शाळेतील शिक्षक बाळु सांळुखे व अर्जुन माळी जवळ येवुन त्यातील बाळु सांळुखे यांनी मला तुम्ही मुख्याध्यापकचा चार्ज का देत नाही, मला मुख्याध्यापकाचा चार्ज देणेबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांचेकडून पत्र दिले आहे, तरी सुध्दा तुम्ही मला सदर शाळेच्या मुख्याध्यापकाचा चार्ज देत नाही, असे म्हणुन बाळू सांळुखे यांनी माझी साडी पकडून ती ओडून माझा डावा हात धरून मला मारहाण करून, गालावरून हात फिरवुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.
त्यावेळी त्यांचेसोबत असलेले अर्जुन महादेव माळी यांनी ही बाई कसा चार्ज देत नाही ते अपण बघून घेवू असे म्हणून -शिवीगाळी दमदाटी केली आहे. त्यावेळी ती महिला शिक्षिका आरडाओरडा केला असता लोकं जमा झाले. असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात बाळू तुकाराम साळुंखे व अर्जुन महादेव माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लवटे करीत आहेत.