Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंगमॉलमध्ये जीन्सच्या पाकिटात सुरा घेऊन फिरत होती मुलगी; Video झाला Viral

मॉलमध्ये जीन्सच्या पाकिटात सुरा घेऊन फिरत होती मुलगी; Video झाला Viral

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सध्या जग एवढं पुढं गेलं आहे की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनेक ठिकाणी या प्रगतीचे संकेत देतात. अनेकदा तर अशा गोष्टी पहायला मिळतात की ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते. लोकांची डोकीही एवढ्या वेगाने आणि भन्नाट पद्धतीने चालतात की कोणत्या गोष्टी या सुपीक डोक्यांमधून निघतील हे सांगता येत नाही. सध्या सगळ्यांकडेच मोबाईलच्या रुपामध्ये पाच इंचाच्या स्क्रीनमध्ये सामावलेलं जग असतं. मुलींकडे तर त्यांच्या मोबाईल इतकेच त्या मोबाईलचे कव्हरही असतात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की मुलींचे मोबाईल फोन कव्हर लक्ष वेधून घेतात. अगदी हातात असो किंवा पॅण्टच्या खिशात मोबाईल ठेवलेला असो हे कव्हर उठून दिसतात हे मात्र नक्की. मात्र सध्या जो व्हिडीओ समोर आला तो पाहून अनेकांना धक्का बसला असून एका तरुणीच्या खिशात असलेली गोष्ट आणि तिचा तिने केलाला वापर चर्चेचा विषय ठरत आहे.



व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका मॉलमध्ये एक्सलेटरवरुन वरच्या मजल्यावर जात असल्याचं दिसत आहे. या मुलीच्या पुढे अनेक मुली एक्सलेटरवर उभ्या असल्याचं दिसत आहे. यापैकी एका मुलीच्या जिन्सच्या मागच्या खिशात मोठ्या आकाराच सुरु खुपसून ठेवल्याचं दिसत आहे. या सुऱ्याचा आकार बराच मोठा असल्याचं प्रथमदर्शनी दिसते. खरं तर अशाप्रकारे एखादी व्यक्ती सुरा घेऊन मॉलमध्ये तुमच्या पुढे एक्सलेटरवरुन जात असेल तर कोणाचीही भितीने गाळण उडेल. या मुलीच्या मागून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे.

अचानक ती मुलगी आपल्या खिशातील हा सुरा काढते आणि तो कानाला लावते आणि बोलू लागते. जे काही घडलं ते पाहून या मुलीच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनाही विश्वास बसला नाही. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून क्षणभर काय सुरु आहे हे समजणार नाही. मात्र नीट पाहिल्यास या मुलीच्या जीन्सच्या मागच्या खिशात दिसणारा हा सुरा म्हणजे सुऱ्याच्या आकाराचा मोबाईल कव्हर आहे. मात्र हा कव्हर इतका हुबेहुब आहे की क्षणभर या मुलीच्या खिशात सुरा असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -