कोल्हापूरच्या शेळेवाडीतील विद्यालंकार शाळेत मुलींना शिक्षकानं पॉर्न फिल्म दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या संतापानंतर आरोपी शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली आहे. तसेच प्रकरण लपवणाऱ्या मुख्याध्यापक आणि इतरांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.
शालेय मुलींना अश्लील फिल्म दाखवणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव विजयकुमार बागडी आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात ही घटना घडली आहे. सात पीडित मुलींनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्याअलंकार शेळेवाडीच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली आहे. या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवत विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली.
हा सर्व प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू असून याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेले पालकानी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षकाने पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला. माध्यमांनी हे प्रकरण समोर आणल्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करून अटक केलं आहे. विद्यार्थ्यांमधून तसेच पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे.
इंग्रजीच विषयाचा शिक्षक असलेल्या विकृत बांगडीने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवला. यानंतर या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून शिक्षक बांगडीने हे असे प्रकार केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनींनी केला आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्यांनी केली आहे. असा प्रकार शाळेमध्येच घडल्याने आता पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित विद्यार्थीनींकडून करण्यात आली आहे.