Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरहृदयद्रावक! 9 महिन्यांच्या चिमुरड्याचा पीठात गुदमरुन मृत्यू, कोल्हापुरातील घटना

हृदयद्रावक! 9 महिन्यांच्या चिमुरड्याचा पीठात गुदमरुन मृत्यू, कोल्हापुरातील घटना

नवीन वाशीनाका येथील यमगर कुटुंबातील 9 महिन्यांच्या चिमुरड्या बालकाचा पीठामध्ये पडून गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली.कृष्णराज राजाराम यमगर (मुळगाव बिळाशी ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत चिमुरडय़ाचे नाव आहे.

कृष्णराज हा आपल्या घरात वॉकरच्या सहाय्याने खेळत होता. मात्र अचानक तोल जाऊन तो पीठाच्या बुट्टीत पडला आणि धायमोकलून रडू लागला. त्यामुळे त्याच्या नाका-तोंडावर पीठ जाऊन तो गुदमरू लागला. घरच्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कृष्णराजचे निधन झाल्याची वार्ता कळताच नवीन वाशीनाका परिसरात शोककळा पसरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -