कर्नाटक- जयगडकडे साखर घेऊन जात असलेला ट्रक आंबा घाटातील चक्री वळणावर दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकचालक राणा ईरा चावडा वय 62 राहणार पोरबंदर गुजरात हे जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणूनच या भीषण अपघातात चालक बचावले या अपघाताची नोंद साखरपा पोलिसात झाली आहे. या अपघातात सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाल्याची ही प्रथम दर्शनी चर्चा सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्री राणा चावडा हे कर्नाटकहून जयगडकडे साखर घेऊन जात होते.चक्रीवळणावर येताच गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक.(नं.जी.जे.११झेड०७३७.)संरक्षण कठडा तोडून थेट दरीत सव्वाशे फूट खोल कोसळला. दरीच्या मार्गावर झाडे असल्याने ट्रक सावकाश कोसळला यामध्ये राणा केबीनमध्ये अडकले. त्यांच्या डाव्या पायाची टाच तुटली.येथील अमर पारळे व सोबत दोन मित्रांनी चालकास तातडीने केबीनमधून काढून आंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास दाखल केले.तेथून त्यांना 108 च्या सेवेन कोल्हापूर सीपीआर मध्ये दाखल केले आहे. अधिक तपास पी.आय. प्रदीप पोवार,पो.हेड का.सागर उगळे,प्रताप वाकरे,ट्राफिक पोलीस तुषार आम्बरे तपास करीत आहे.ट्रकाची पूर्ण नुकसान झाले आहे.साखरेसह वीस लाखाची हानी झाल्याचे श्री सागर उगळे यांनी सांगितले.