Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर -पुणे आणि कोल्हापूर-सातारा पॅसेंजर माहिनाभर बंद

कोल्हापूर -पुणे आणि कोल्हापूर-सातारा पॅसेंजर माहिनाभर बंद

कोल्हापूर -पुणे आणि कोल्हापूर सातारा पॅसेंजर रेल्वे माहिनाभर राहणार बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने सांगितली आहे. सातारा -कोरेगाव लोहमार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर हरिप्रिया(तिरुपती) एक्सप्रेस देखील पुढील आठ दिवस बेळगाव मधून धावणार आहे. त्यामुळे आता तिरुपती जाणाऱ्यांना बेळगाव मधून प्रवास करावा लागणार आहे.

नोकरी,व्यवसायानिमित्त सातारा तसेच पुण्याला कोल्हापुरातून नियमित जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.कोल्हापुरात सकाळी ९ वाजता येणारी सातारा पॅसेंजर,सायंकाळी पाच वाजता पुन्हा साताऱ्याला निघते.त्यामुळे नोकरदार तसेच व्यावसायिक घटकांना उपयोगी ठरणाऱ्या दोन्ही रेल्वे तूर्त बंद राहणार असल्याने प्रवाशांना अन्य पर्याय शोधावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -