Tuesday, August 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सफरचंदच्या बॉक्सने भरलेल्या कंटेनर कागलजवळ महामार्गावर जळून खाक

कोल्हापूर : सफरचंदच्या बॉक्सने भरलेल्या कंटेनर कागलजवळ महामार्गावर जळून खाक

सफरचंदच्या बॉक्सने भरलेल्या कंटेनरला कागल येथील महामार्गावर आग लागली. या आगीमध्ये कंटेनरची केबिन जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आगीचे कारण समजू शकले नाही.

मुंबईहून बेंगलोरकडे सफरचंदचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनरला लक्ष्मी टेकडी येथील महामार्गावर सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आगीचा भडाका उडल्याने चालकाची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. तर कंटेनर मधील सफरचंदने भरलेल्या बॉक्सलाही त्याची झळ पोचली. यामध्ये कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत तसेच कागल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. यावेळी कोल्हापूर – कागलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -