Tuesday, April 23, 2024
Homeकोल्हापूरपंचगंगा होणार प्रदूषणमुक्त

पंचगंगा होणार प्रदूषणमुक्तपंचगंगेला पडलेला प्रदूषणाचा विळखा काहीसा सैल होत चालला आहे. यामुळे कोल्हापूरची वरदायिनी असलेली पंचगंगा प्रदूषणमुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रदूषणाच्या जोखडातून पंचगंगेला कायमचे मुक्त करण्याची सार्‍यांचीच जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पाडण्याची गरज आहे.

प्रदूषणाने पंचगंगेला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. प्रदूषणाचे स्वरूप अनेकदा गंभीर झाले. ज्या ज्या वेळी प्रदूषणाचे परिणाम जनमानसावर, जलचरांवर झाले, त्या त्या वेळी पंचगंगा प्रदूषणमुक्तीची गांभीर्याने चर्चा होत गेली. न्यायालयानेही याची दखल घेत समिती नेमली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बैठक घेतली. थेट मुख्यमंत्री कार्यालयच प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंचगंगा प्रदूषणासाठी 220 कोटी रुपयांचा आराखडाही तयार केला जात आहे. या सर्वाला कधी मूर्त स्वरूप येईल, त्यातून पंचगंगा कधी प्रदूषण मुक्त होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

सांडपाण्याची स्थिती (जानेवारी 2021 अखेर)
कोल्हापूर शहर : 96 एमएलडी प्रतिदिन निर्मिती; 91 एमएलडीवर प्रक्रिया इचलकरंजी शहर : 38 एमएलडी प्रतिदिन निर्मिती; 20 एमएलडी प्रक्रिया 174 गावे : 23 एमएलटी प्रतिदिन निर्मिती; प्रक्रिया नाही उद्योग : 18 एमएलटी प्रतिदिन निर्मिती; 18 एमएलडी प्रक्रिया.

…असा आहे प्रस्तावित आराखडा
कोल्हापूर शहर : 100 एमएलङी पाण्याचा पुनर्वापर, 10 एमएलडी अतिरिक्त एसटीपी, विसर्जन कुंड, धोबी घाट, जनावरे धुणे आदी (45 कोटी) इचलकरंजी शहर : नवीन 30 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार, घरगुती उद्योगासाठी सांडपाणी प्रक्रिया (40 कोटी) पाच गावांत क्लस्टर : 1. गांधीनगर, मुडशिंगी, वळीवडे 2. उचगाव 3. कळंबा, पाचगाव 4. चंदूर, कबनूर 5. तळदंगेे. नदीकाठावरील 37 गावांसाठी एसटीपी, 137 गावांसाठी अन्य उपाययोजना, पायाभूत सुविधा.

द़ृष्टिक्षेपात पंचगंगा
एकूण लांबी : 81 किलोमीटर (प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी) एकूण उपनद्या : भोगावती, तुळशी, कुंभी, धामणी, कासारी (प्रत्यक्ष नाही) एकूण बंधारे : 7 (तीन तालुके).

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -