मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत राज्यात ठिकठिकाणी मुसलमानांकडून बेकायदा मशिदी उभ्या होत असल्याचा मुद्दा मांडताना मुंबईतील माहीम समुद्रकिनाऱ्याकडील बेकायदा दर्गा आणि सांगली – कुपवाड महापालिका क्षेत्रातील बेकायदा मशिदीचा उल्लेख केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने माहीम येथील अनधिकृत दर्गा हटवला, आता सांगलीतील बेकायदा मशिदीवरही हातोडा मारण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर राज्य सरकार सतर्क झाले. त्यानंतर सांगली-कुपवाडा महापालिका आणि पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले. ताबडतोब विभागाकडून या ठिकाणी नव्या रचनेच्या माध्यमातून या जागेची मोजणी करण्यात आली. यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा स्पष्ट केले. या जागेवर सांगली महापालिका शाळेचे आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर हे आरक्षण आहे. त्यामुळे या जागेवरील अनधिकृत मशिदीचे बांधकाम तोडण्यात येईल, असे पवार म्हणाले.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगली – कुपवाडातील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -