भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2023 ला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच आता प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने क्रिकेटप्रेमींसाठी 3 नवीन क्रिकेट प्लॅन जाहीर करत क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित केला आहे. या प्लॅनची सुरुवातीची किंमत 219 रुपये आहे.या प्लॅनची सुरुवातीची किंमत 219 रुपये आहे. या प्लॅन्ससोबत कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर सुविधाही देत आहे. कंपनी उद्यापासून म्हणजेच 24 मार्च 2023 पासून हे क्रिकेट प्लॅन उपलब्ध करून देत आहे. आज आपण या तिन्ही प्लॅन्सबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया….
Jio चा 219 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
हा जिओचा सर्वात स्वस्त क्रिकेट प्लॅन आहे. यामध्ये जिओच्या वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी डेटाचा लाभ मिळतो. या प्लानचा फायदा घेण्यासाठी 14 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 25 रुपयांचे फ्री व्हाउचर देखील उपलब्ध असेल. यूजर्स या प्लॅनसह उपलब्ध असलेल्या मोफत व्हाउचरमधून 2 जीबी अतिरिक्त डेटा देखील घेऊ शकतील.
Jio चा 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
जिओच्या 399 रुपयांच्या प्रीपेड क्रिकेट प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते. यामध्येही तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना या प्लॅनसह 61 रुपयांचे मोफत व्हाउचर देत आहे, ज्यामध्ये 6 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल देखील मिळतात.
Jio चा 999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळते. त्याच वेळी, या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या क्रिकेट प्लॅनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना या प्लॅनच्या अंतर्गत 241 रुपयांचे मोफत व्हाउचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही गरज पडल्यास 40 GB पर्यंत अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकाल.
Jio ने या तीन क्रिकेट प्लॅनसोबतच आपल्या ग्राहकांना ३ नवीन डेटा अॅड-ऑन प्लॅन्सही लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये 50 GB, 100 GB आणि 150 GB पर्यंत अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. यामधील सर्वात स्वस्त क्रिकेट डेटा अॅड-ऑन प्लॅनची किंमत 222 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा अॅड-ऑन करता येतो. या प्लॅनची वैधता यूजर्सच्या आधीच्या प्लॅनपर्यंत असेल.
IPL सुरू होण्यापूर्वी Jio चे खास गिफ्ट; लाँच केले 3 क्रिकेट प्लॅन्स
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -