Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरहसन मुश्रीफ चौथ्यांदा ईडी कार्यालयात, तब्बल साडे सात तास चौकशी

हसन मुश्रीफ चौथ्यांदा ईडी कार्यालयात, तब्बल साडे सात तास चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आज चौथ्यांदा ईडी कार्यालयात गेले. त्यांची जवळपास साडे सात तास चौकशी करण्यात आली.हसन मुश्रीफ सलग साडे सात तासांच्या विस्तृत चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आपण ईडीला चौकशीत सहकार्य केलं. ईडी अधिकाऱ्यांचा कोणताही प्रश्न टाळला नाही, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी चौकशीनंतर दिली.

“मला पुन्हा बोलावलं तर मी पुन्हा येईल, असं त्यांना मी सांगितलं. त्यांना तपासात अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. मी त्यांचे कोणतेही प्रश्न टाळले नाहीत. योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. मला ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काल इथे हजार पेक्षा जास्त लोकं आमचं स्टेटमेंट घ्या, आमची कोणतीही फसवणूक झालेली नाही, हे सांगण्यासाठी आले होते. ईडी अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि त्यांनी दिलेली कागदपत्रे जमा करुन घेतली, असं ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं”, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

“मी आज चौथ्यानंदा आलो. तीन दिवस माझं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. मी सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. माझं आज स्टेटमेंट पूर्ण झालं आहे. तपासात मी त्यांना संपूर्णपणे सहकार्य करतोय. त्यांना गरज लागली तर मी पुन्हा येईल असं त्यांना कळवलंय. मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलाय. न्यायालय आपल्यासाठी चांगला निर्णय देईल कारण आज माझा वाढदिवस आहे”, असं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

विशेष म्हणजे फक्त हसन मुश्रीफ यांचीच नाही तर त्यांचे सीए महेश गुरव यांचीही आज ईडी चौकशी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -