Sunday, July 6, 2025
Homeनोकरीसीआरपीएफ च्या 9212 पदांसाठी कॉन्स्टेबल भरती!

सीआरपीएफ च्या 9212 पदांसाठी कॉन्स्टेबल भरती!

CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाने CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली आहे.या अधिसूचनेनुसार 9212 जागेसाठी ही भरती केली जाणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळ crpf.gov.in वर 27 मार्च 2023 पासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. अधिसूचनेनुसार CRPF ने रिक्त जागेसाठी ही मोठी भरती जाहीर केली आहे.

सीआरपीएफची ही नोंदणी प्रक्रिया 27 मार्च 2023 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. CRPF भरतीबाबत, उमेदवाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे अवजड वाहतूक वाहन चालविण्याचा परवानाही असणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरतीच्या वेळी ड्रायव्हिंग चाचणी देखील उत्तीर्ण करावी लागेल.

CRPF भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीद्वारे, PST, PET, व्यापार चाचणी, DV आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. CRPF भर्ती प्रवेशपत्र 20 जून 2023 रोजी जाहीर केले जाईल आणि 25 जून 2023 पर्यंत डाऊनलोड केले जाऊ शकते. CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 ची परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै 2023 या कालावधीत होणार आहे.

अधिसूचनेनुसार उमेदवारांचे वेतन 21,700 ते 69,100 रुपयांच्या दरम्यान असायला हवे. या व्यतिरिक्त अनुसूचित जाती/ जमाती आणि महिला उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही तर पुरुष उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील. यासंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पहा.

CRPF उमेदवारांना सदर सूचना डाऊनलोड करण्याचा आणि प्रत्येक नियम काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, 27 मार्चपासून अर्ज मागविण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -