Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानXiaomi लॉन्च केलं ब्लुटूथ कॉलिंग सपोर्ट देणारं स्मार्टवॉच, एकदा चार्ज करा आणि...

Xiaomi लॉन्च केलं ब्लुटूथ कॉलिंग सपोर्ट देणारं स्मार्टवॉच, एकदा चार्ज करा आणि…

Xiaomi केवळ मोबाईलच नाही तर अनेक नव नव्या एक्ससरीज बनवत आहे. आता Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने नवीन Redmi Watch 3 ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. याचं खास वैशिष्ट असं आहे की, यात ब्लुटूथ कॉलिंग सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह या रेडमी वॉचमध्ये अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. आज याच watch ची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

रेडमी वॉच 3 किंमत हे रेडमी स्मार्टवॉच आपल्याला 10 हजार 600 रूपयांना मिळणार आहे. हे घड्याळ भारतीय बाजारपेठेत कधी पर्यंत येईल याबद्दल काही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

हे watch Ivory आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. Redmi smart watch 3 मध्ये स्पेसिफिकेशन्स या रेडमी स्मार्टवॉचमध्ये 1.75-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 390×450 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. घड्याळ 600 nits ब्राइटनेस आणि 60Hz रिफ्रेश देते

रेडमी वॉच 3 मध्ये १२१ स्पोर्ट्स मोड आहेत ज्यात आउटडोर रनिंग, सायकलिंग आणि पोहणे इ. यामध्ये घड्याळाच्या बॉक्सला सपोर्ट असलेले १० बिल्ट इन रनिंग बॉक्स आहेत. तसेच यामध्ये ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट ट्रॅकर आणि स्लिप मॉनिटर हे हेल्थ फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत.

यामध्ये तुम्हाला २८९mAh ची बॅटरी मिळेल जी एकदा चार्ज केली १२ दिवसांपर्यंत चालेल. तसेच हे स्मार्टवॉच ndroid 6.0 किंवा iOS 12 नंतर चालणार्‍या सर्व उपकरणांशी कनेक्ट असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -