सण आणि उत्सवांच्या मुहूर्तावर भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. कारण वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने (Flipkart) प्रतिस्पर्धी अमेझॉनच्या उत्सवाच्या मुहूर्तावरील सेलच्या एक दिवस अगोदर 3 ऑक्टोबरपासून ‘द बिग बिलियन डेज’ (Flipkart Big Billion Days) सेल सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
फ्लिपकार्टने याआधी मंगळवारी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा (Flipkart Big Billion Days) आठवा सीझन यावर्षी 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल अशी माहिती दिली होती. परंतु एका वृत्तानुसार फ्लिपकार्टने आता 3 ऑक्टोबरपासून हा सेल लाँच करण्याची घोषणा केली आहे आणि ही सेल 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले की, “फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days) लाखो विक्रेत्यांसाठी महत्वाचे आहे. कारण ते कोरोना साथीच्या आजारानंतर त्यांचा व्यवसाय परत उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत”.
कृष्णमूर्ती म्हणाले की, “या कार्यक्रमामुळे पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होतो. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) आता 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. यामुळे हा सेल आठ दिवसांचा कार्यक्रम असेल”. दरम्यान, एक दिवस आधी अॅमेझॉन इंडियाने (amazon india) म्हटले होते की ते आपला महिनाभराचा सणांच्या मुहूर्तावरील सेल ‘द ग्रेट इंडियन फेस्टिवल’ (amazon the great indian festival)) 4 ऑक्टोबरपासून सुरू करेल.
सणासुदीच्या काळात (indian festival offers) दोन्ही कंपन्या आपापल्या सेल उत्सवामुळे आमने सामने येणार आहेत. या काळात सवलती नवीन ऑफर आणि परवडणारे पर्याय जसे EMI ऑफर ग्राहकांना विविध भागीदारीद्वारे दिले जातात. दुसरीकडे फ्लिपकार्ट समूहाची कंपनी मिंत्रा (Myntra) देखील 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान ‘बिग फॅशन फेस्टिव्हल’ (Big Fashion Festival) आयोजित करणार आहे.
फ्लिपकार्टचा ‘द बिग बिलियन डेज’ सेल आता 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार;
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -