शेतात ऊस भांगलण करीत असणाऱ्या महिलेवर अचानकच गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. उज्वला जानबा यादव (वय-४० रा. घाटकरवाडी ता.आजरा ) असे जखमी महिलेचे नाव आहे.वायंगणहोळ-डोंगरवाडी नावाच्या शेतात आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
आज सकाळच्या सुमारास उज्वला यादव या आपल्या शेतातील घराशेजारी असणाऱ्या उसाची भांगलण करीत होत्या. अचानक समोरून आलेल्या गव्याने त्यांना जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. शेजारी असणाऱ्या ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने गव्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
तातडीने उज्वला यांना पती जानबा यादव यासह ग्रामस्थांनी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल स्मिता ठाकरे व वनपाल सुरेश गुरव यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
कोल्हापूर : शेतात काम करणाऱ्या महिलेवर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -