जत शहरालगत एका तरूणाचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसात जत तालुक्यामध्ये खूनाच्या तब्बल आठ घटना घडल्या आहेत.भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत याला पकडण्यासाठी २५ हजार रूपयांचे बक्षिस पोलीसांनी जाहीर केले आहे.
आज सकाळी जत-अथणी मार्गावरील यल्लमा विहीरीजवळ सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३३) याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. अज्ञातांने धारदार हत्याराने वार करून मदने याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासावरून स्पष्ट झाले असून जत पोलीस सर्व शक्यता गृहित धरून या खूनाची उकल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मृत मदने हा वाहन चालक म्हणून कार्यरत होता. तो मदने वस्ती येथील घरी काल रात्रीपासून आलेला नव्हता. आज सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना मृतदेह आढळला. यानंतर हा प्रकार समोर आला.
जतमध्ये गेले पंधरा दिवस खूनाची मालिका सुरू असून हा आठवा प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या दुहेरी खूनानंतर ही मालिका अखंडित सुरू आहे.
दरम्यान, जतचे भाजपचे माजी उपनगराध्यक्ष विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी मुख्य संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत अद्याप फरार असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून तीन पिस्टल, सहा जिवंत काडतुसे गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, दोन एअरगन जप्त करण्यात आले आहेत. फरार सावंत याला अटक करण्यासाठी दोन विशेष पथके तैनात करण्यात आली असून त्याचा ठावठिकाणा सांगणार्यासाठी २५ हजारांचे बक्षिस पोलीसांनी जाहीर केले आहे.
जतमध्ये तरुणाचा खून, पंधरा दिवसात आठवी घटना
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -