Monday, July 28, 2025
Homeक्रीडाज्या ठिकाणी माहिचा षटकार पडला तिथे स्मृतिस्तंभ उभरला जाणार!

ज्या ठिकाणी माहिचा षटकार पडला तिथे स्मृतिस्तंभ उभरला जाणार!

वानखेडे स्टेडिअमवर २०११ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनीचा मॅच विनिंग षटकार आणि रवी शास्त्री यांचे समालोचन प्रत्येकाची उत्कंठा वाढवणारे होते. आजाही तो क्षण प्रत्येक क्रीडा प्रेमींच्या डोळ्यासमोर आहे. दोन एप्रिल २०११ रोजी धओनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखरा याला षटकार लगवात भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. तो क्षण हजारो भारतीयांसाठी अभिमानाचा होता.. धोनीचा हाच षटकार अजरामर होणार आहे. होय.. धोनीने जिथे षटकार लगावला त्या ठिकाणी विजयाचा स्मृतिफलक किंवा स्मृतिस्तंभ उभारण्यात येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी याबाबतची माहिती दिली. 

महेंद्रसिंग धोनीनं २०११ साली वानखेडे स्टेडियमवरच्या विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकलेल्या निर्णायक षटकाराची आठवण कायमस्वरुपी जतन करून ठेवण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी ही घोषणा केली. धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर चेंडू वानखेडे स्टेडियमच्या विठ्ठल दिवेचा स्टॅंडमध्ये जिथं पडला, त्या खुर्च्यांच्या ठिकाणी धोनीच्या नावानं भारताच्या विश्वचषक विजयाचा स्मृतिफलक किंवा स्मृतिस्तंभ उभारण्यात येईल. आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमधला सामना शनिवार, आठ एप्रिल रोजी खेळवण्यात येईल. त्या सामन्यानिमित्तानं एमसीएच्या वतीनं धोनीचा वानखेडे स्टेडियममधल्या त्याच ऐतिहासिक जागेवर सन्मान करण्यात येईल, अशी माहिती अमोल काळे यांनी दिली.

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले की, “मंगळवारी (४ एप्रिल) आम्ही याबाबत महेंद्रसिंग धोनीशी संपर्क साधणार आहोत. विजय स्मारकाच्या उद्घाटनासाठी धोनीकडे वेळ मागणार आहे. ८ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी मुंबईत येणार आहे. त्यावेळी स्मारकाचे  उद्घाटन करण्याची योजना आहे. धोनी यासाठी होकार देईल अशी एमसीएला आशा आहे. स्मारकाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही, कारण ती पूर्णपणे धोनीच्या संमती आणि उपलब्धतेवर अवलंबून असेल. वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक विजय स्मारकाचे उद्घाटन करताना एमसीए धोनीचा सत्कार करणार आहे, असेही काळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -