Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरज्येष्ठांसह को-मॉर्बीड व्यक्तींना प्रिकॉशन डोस द्या; आरोग्य सचिवांची सुचना

ज्येष्ठांसह को-मॉर्बीड व्यक्तींना प्रिकॉशन डोस द्या; आरोग्य सचिवांची सुचना

राज्यात एंन्फ्ल्युएंझा, कोरोनाचा धोका वाढला आहे, या पार्श्वभुमीवर पुढील दोन महिने कोरोना नियमावलीचे पालन करा. जनतेत त्यासाठी जागृती करा.ज्येष्ठ, को-मॉर्बीड व्यक्तींना उपलब्ध कोव्हॅक्सिनचा प्रिकॉशन डोस द्या,त्यामुळे त्यांना संरक्षण लाभेल.याशिवाय अद्ययावत अतिदक्षता विभाग,ऑक्सिजन बेडचे नियोजन करा, अशा सुचना राज्याच्या आरोग्य सचिवांनी सोमवारी आढावा बैठकीत केल्या.

एप्रिल,मे उन्हाळी सुट्यांचा,यात्रांचा हंगाम आहे.त्यामुळे गर्दीही वाढणार आहे.वाढत्या तापमानामुळे वातावरणातील घातक विषाणू वाढण्याचा धोका आहे.राज्यात गेल्या तीन महिन्यांत एंन्फ्ल्यूएंझाचे रूग्ण वाढले आहेत,कोरोना रूग्णांतही हळूहळू वाढ होत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.एन्फ्ल्यूएंझा,कोरोनाचा संभाव्य धोका पाहता सोमवारी आरोग्य सचिव डॉ. नवीन सोना यांनी आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, अभियान संचालक डॉ.नितीन आंबर्डेकर होते. बैठकीत आरोग्य उपसंचालक,शल्य चिकित्सक,आरोग्य अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

आरोग्य सचिव डॉ.सोना म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे कोरोना, एन्फ्यूएंझाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या साथीच्या संशयित रूग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे.संभाव्य साथीला प्रतिबंधासाठी अद्ययावत अतिदक्षता विभाग,ऑक्सिजन बेडची तयारी ठेवा.पुर्वीप्रमाणे आयसोलेटेड वॉर्डचे नियोजन करा,ऑक्सिजन साठा,ऑक्सिजन सिलिंडर,ऑक्सिजन प्लँटची तपासणी करा,यासंदर्भात त्रुटी असल्यास माहिती द्या,अशा सुचना केल्या.

राज्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा आहे,कोव्हिशिल्ड लसीची मागणी केली आहे.सध्या उपलब्ध कोव्हॅक्सिन लस को-मॉर्बीड रूग्ण,ज्येष्ठांना प्रिकॉशन डोस म्हणून द्यावी.त्यासाठी लोकांमध्ये जागृती करा.कोरोना अन् एंन्फ्ल्यूएंझा साथीत काही लक्षणे सारखी असल्याने सर्दी,ताप,खोकल्याचे रूग्ण असल्यास तातडीने तपासणी करा.सर्वात महत्वाचे कोरोना नियमावलीच्या वापरासाठी जनतेत जागृती करा,गर्दीत मास्क वापरण्याचे आवाहन करा,अशीही सुचना डॉ. सोना यांनी केली.

आरोग्य आयुक्त धीरज कुमार म्हणाले,राज्यात गेल्या 3 महिन्यांत एच वन एन वनचे 451 तसेच एच थ्री एन टू चे 365 रूग्ण आहेत.त्यातील अद्यापी 98 रूग्ण उपचार घेत आहेत.या साथीने राज्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.आता कोरोना रूग्णांतही वाढ होत आहे.त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे. पुढील दोन महिने महत्वपुर्ण आहेत.या काळात कोरोना नियमावलीचा गर्दीच्या ठिकाणी प्रभावी रितीने अंमल व्हावा,यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचनाही केल्या.

एंन्फ्ल्यूएंझा, कोरोनाचे विषाणू व्हेरीएंट बदलत आहेत.अशा नव्या व्हेरिएंटच्या संशयित रूग्णांची माहिती वरिष्ठांना द्या.रूग्ण,त्याचा प्रवास,लसीकरण, इन्फेक्शनची माहिती तपशीलवार घ्या, व्हेरिएंट सापडलेल्या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधा अन् ‘आयसीएमआर’च्या गाईडलाईननुसार त्यांच्या टेस्ट करा, रूग्ण सापडलेल्या परिसरात सर्व्हेक्षण मोहीम राबवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा,असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीला जिल्ह्यातून आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोडेकर, जिल्हा बाह्dया संपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांतील वैद्यकीय अधिक्षक ऑनलाईन सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -