दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरु असलेल्या आयपीएलवर कोरोनाचे सावट पसरले आहे.
आकाश चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल 2023 च्या सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये जिओ सिनेमासाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री करत आहे. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिले, व्यत्ययाबद्दल क्षमस्व. कोविडने माझ्यावर पुन्हा एकादा हल्ला केला आहे.
क्रिकेट हिंदी कॉमेंट्री क्षेत्रात आकाश चोप्रा लोकप्रिय आहे. त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. आयपीएल 31 मार्चपासून सुरू झाली आहे. लीग स्टेज 21 मे पर्यंत चालणार आहे. त्यानंतर हे प्लेऑफ सामने होतील. 28 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.