Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगमहागाईचा भडका; गहू, ज्वारी आणि बाजरीनं ओलांडली पन्नाशी, तर डाळी 120 ते...

महागाईचा भडका; गहू, ज्वारी आणि बाजरीनं ओलांडली पन्नाशी, तर डाळी 120 ते दीडशेच्या घरात!

महाराष्ट्रात महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीद डाळ, मुग डाळ, तूर डाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट बिघडलं आहे. सर्वसामान्यांच्या ताटातले जवळपास सर्वच पदार्थ महागल्यामुळे घराचा रहाटगाडा हाकताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धान्य उत्पादनाला बसला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर गेले आहेत. अवकाळी पावसामुळे धान्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. मात्र, शेतीचे नुकसान झाल्यानं उभ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. गहू, ज्वारी, मका, केळी, द्राक्ष, संत्री यांचं नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झालं आहे. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरी पन्नास रुपये प्रतिकिलो दरानं मिळत आहेत.

दर (प्रति किलो)
गहू 36 ते 38
ज्वारी 52 ते 70
बाजरी 40 ते 44
तूर डाळ 130 ते 150
मूग डाळ 120 ते 130
उडीद डाळ 120 ते 140
मूग 110 ते 130
मटकी 120 ते 160
शेंगदाणे 140 ते 170

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -