Friday, February 7, 2025
Homeमनोरंजन"तू माझा डायमंड मी तुझी रिंग कोणता.?" धमाल उखाण्यांनी लग्नसराईत चढला आयपीएलचा...

“तू माझा डायमंड मी तुझी रिंग कोणता.?” धमाल उखाण्यांनी लग्नसराईत चढला आयपीएलचा फिव्हर

देशात सध्या IPL२०२३ आणि लग्नाचा सीझन जोरदार सुरु आहे. त्यामागील कारणही तसेच आहे, सलग दोन वर्ष कोरोना असल्याने क्रिकेट चाहते आणि लग्न अतिशय सध्या पद्धतीने झाले. त्या दोन वर्षाची भरपाई म्हणून यंदा धमाल, मजा, मस्ती करत चाहते आनंद घेत आहेत.

त्यात आयपीएलवर आधारित असेच काही लग्नातील उखाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या बाजूला आयपीएल सुरु होऊन काही दिवसच झाले आहेत आणि त्यात वेगवेगळ्या माध्यमांना वाचक, क्रिकेट रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

लग्नातील असेच काही मनोरंजक उखाणे

फेसबुकवर सध्या अशाच नुकतेच नवीन लग्न झालेल्या एका विवाहित जोडप्याचा आयपीएलवरील उखाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वधू-वरांप्रमाणे नातेवाईकही त्यात मजेशीर उखाणा घेत असल्याचा रील व्हिडिओत दिसत आहे. त्यात नवदांपत्याचे उखाणे पुढीलप्रमाणे:

वधू (भाग्यश्री): ” सुमितराव माझे डायमंड मी त्यांची रिंग, आयपीएलची शान म्हणजे चेन्नई सुपर किंग्स”

वर (सुमित): “भाग्याचा नाव घेतो चेन्नई सुपर किंग्सचा मान राखून भाग्याची शपथ घेऊनच सांगतो यावर्षी मुंबईच जिंकेल ते पण चार गडी राखून…”

नातेवाईक: “मुंबई आणि चेन्नईचे फॅन नेहमी करतात विस्फोट मला नाही वाटत यांचे जास्त टिकेल लवकरच होईल यांचा घटस्फोट…” पुढे त्याला दोन्ही गंमतीत मारतात मग तो म्हणतो, “यावर्षी बहुतेक रॉयल चॅलेंजर बंगळुरू जिंकणार असं वाटत…”असे अतरंगी रील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. वधू ही चेन्नई सुपर किंग्सची फॅन तर वर हा मुंबई इंडियन्सची फॅन असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -