गतउपविजेता राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल.सलामीच्या लढतीत राजस्थानने सनरायजर्स हैदराबादवर, तर पंजाबने कोलकाता नाइट रायडसर्वंर मात केली होती.
राजस्थानने हैदराबादवर ७२ धावांनी मोठा विजय मिळवला. पंजाबला विजयासाठी पावसाची मदत झाली. पंजाबने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार कोलकाताचा सात धावांनी पराभव केला. त्यामुळे बुधवारी गुवाहाटी येथे होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळू शकेल.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाचे दोन ‘घरचे’ सामने गुवाहाटी येथे होणार आहेत. या दोन सामन्यांत विजय मिळवल्यास राजस्थान संघाची या भागातील लोकप्रियता मोठय़ा प्रमाणात वाढू शकेल. तसेच चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी तारांकित खेळाडूंची फळीही राजस्थानकडे उपलब्ध आहे. राजस्थानच्या संघाला यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे, शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी उत्सुक असेल. राजस्थानच्या तुलनेत पंजाबच्या संघात तारांकित खेळाडूंची संख्या कमी असली, तरी त्यांचे खेळाडू मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यात सक्षम आहेत. त्यामुळे पंजाबला नमवण्यासाठी राजस्थानच्या खेळाडूंना आपला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.
राजस्थानचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही विभागांत संतुलित असला, तरी फलंदाजीत जोस बटलर आणि गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट यांची कामगिरी राजस्थानसाठी निर्णायक ठरते. बटलरने सलामीच्या लढतीत अवघ्या २२ चेंडूंत ५४ धावा फटकावल्या. त्याला सलामीचा साथीदार यशस्वी जैस्वालने (५४) साथ दिली. तसेच कर्णधार सॅमसनने अर्धशतक झळकावले. गोलंदाजीत बोल्ट सुरुवातीच्या षटकांत भेदक मारा करून प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकतो. मग मधल्या षटकांत बळी मिळवण्याची जबाबदारी यजुवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीवर असेल.
सलामीच्या लढतीत पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने २९ चेंडूंत ४० धावांची खेळी केली होती. धवनचा एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूने प्रभसिमरन सिंग आणि भानुका राजपक्षे यांनी आक्रमक खेळी केल्या. आता पंजाबचा संघ याच योजनेनुसार खेळणे अपेक्षित आहे. परंतु धवनने चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रुपांतरण करणे आवश्यक आहे. मधल्या फळीत लियाम लििव्हगस्टोनचे पुनरागमन पंजाबसाठी महत्त्वाचे ठरू शकेल. त्याच्यासह जितेश शर्मा आणि सॅम करन अखेरच्या षटकांत फटकेबाजी करू शकतील. पंजाबच्या गोलंदाजीची धुरा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर असेल.
आज राजस्थान-पंजाब येणार आमनेसामने! कोण मारेल बाजी?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -