आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्याबरोबरच उन्हाच्या झळा देखील चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. या काळात गर्मी इतकी वाढते कि, जीव अगदी नकोस होऊन जातो. अशातच जर अचानक लाईट गेली असा नुसता विचार जरी मनात आला तरी जीव घाबरायला होतो. मात्र उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे हे काही नवीन बाब नाही.देशातील अनेक शहरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत जवळपास 3-4 तास वीजपुरवठा खंडित केला जातो. ज्यामुळे टीव्ही तर काय पंखे देखील लावता येत नाहीत. कारण विज नसल्याने घरातील सर्व उपकरणेच बंद पडतात. इतकेच नाही तर या काळात मुलांच्या परीक्षा देखील असल्याने त्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होतो. याशिवाय लाईट नसल्यामुळे अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागू शकते.
तर आज आपण याच समस्येसाठी एका पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरची माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, या पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरद्वारे आपल्याला घरातील उपकरणे सुरु करता येतील. तर त्याचे नाव आहे SR पोर्टेबल सोलर जनरेटर. जो आता Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत 17,999 रुपये आहे.आकाराने खूप लहान असलेल्या या जनरेटरचे वजन खूपच कमी आहे. याशिवाय यामध्ये एक हँडलही देण्यात आले आहे. ज्यामुळे तो अगदी सहजपणे कुठेही उचलून ठेवता येतो. यामुळे आपल्याला जिथे वीज हवी असेल तिथे तो वापरता देखील येतो. हा नॉइस फ्री देखील आहे. तसेच त्याचे ऍडव्हान्स सर्किट डिझाइन त्याला सुरक्षित देखील बनवते. याशिवाय हा जनरेटर कुठेही अगदी सहजपणे दुरुस्त करता येईल.
याच्या बॅकअप बाबत बोलायचे झाल्यास या पोर्टेबल सोलर जनरेटरमुळे आपल्याला 25 तास एलईडी बल्ब लावता येतील. तसेच 2 तासांपेक्षा जास्त टेबल फॅन चालवता येईल. याशिवाय आपण 3 तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्ट एलईडी टीव्ही देखील लावता येईल. यासोबतच ते कोणत्याही लॅपटॉपला 4 तासांपेक्षा जास्त वेळ बॅकअप देऊ शकेल. एकूणच काय कि, हे आपल्या घरात वापरल्या जाणार्या घरगुती उपकरणांना एनर्जी देण्यासाठी डिझाइन केलेले एक पॉवरफुल प्रॉडक्ट आहे.