Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनत्याची तेवढी लायकी नाही, रणबीर कपूरला उर्फी जावेदचं सडेतोड उत्तर!

त्याची तेवढी लायकी नाही, रणबीर कपूरला उर्फी जावेदचं सडेतोड उत्तर!

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात.मात्र, उर्फी कोणालाही न सडेतोड उत्तर देताना दिसते. अशातच, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने एका मुलाखतीत उर्फीच्या कपड्यांबाबात टिका केली होती. रणबीरच्या या टीकेमुळे आता उर्फीने त्याला देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

एका मुलाखतीत रणबीरला उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यात रणबीरने उर्फीच्या कपड्यांची निवड योग्य नसल्याचं म्हटलं आहे. यावर आता उर्फीने देखील त्याला चांगलंच त्युत्तर दिलं आहे. उर्फी म्हणली की, “तो काय म्हणाला याच्याशी मला काहीही फरक पडत नाही. त्याची तेवढी लायकी नाही.” अशा तिखट शब्दात उर्फीने प्रतिक्रिया दिली आहे.

करीनाने केलं होतं कौतुक

नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान जेव्हा करीनाला उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, उर्फीसारखा आत्मविश्वास तिच्यात नाही. फॅशन म्हणजे स्वत:ला व्यक्त करणे आणि उर्फी हे खूप चांगले करते. करीना म्हणाली होती की, उर्फी ज्या आत्मविश्वासाने स्वतःला घेऊन जाते तो तिला आवडतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -