आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा यंदाच्या मोसमातील पंधरावा सामना असेल. बंगळुरुमध्ये 10 एप्रिल रोजी, सोमवारी एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. लखनौ संघाचा हा चौथा सामना तर, आरसीबीचा तिसरा सामना असेल.
लखनौ सुपर जायंटस् आणि कोलकाता नाईट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. आरसीबी संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. दुसरीकडे, लखनौने पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये आरसीबीचं पारड जड होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात 10 एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.