Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकवटीसह पुरुषाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ!

कवटीसह पुरुषाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ!

परिते ता. करवीर गावच्या हद्दीतील एका झुडपात पुरुष जातीचा कवठीसह पुर्ण सांगाडा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सापडला. भोगावती साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीच्या पाठीमागील बाजूला असलेल्या परिते, ठिकपूर्ली व घोटवडे या तीन गावांच्या सिमेवरच ही घटना घडली. त्यामुळे या तीन्ही गावांसह संपूर्ण भोगावती परिसरात खळबळ उडाली आहे. याची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पंचनामा करून पोलीसांनी संपूर्ण सांगाडा ताब्यात घेतला आहे. दरम्यान सुमारे चार महिन्यांच्या पूर्वीपासून ही बॉडी या ठिकाणी पडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

करवीर पोलीस ठाणे व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी कि, परिते येथील तुकाईचा माळ परिसरातील खडीवर परिते गावातील रहिवासी संतोष बाबालाल शहा व त्यांच्या कुटूंबियांची एकत्रित सुमारे २२ एकर गवती जमीन आहे. दरवर्षी प्रमाणेच पावसाळ्याच्या पूर्वीची स्वच्छता सर्व वाटेकरी मिळून करण्यास गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डोंगरी गवताच्या शेतातील एका झुडपात त्यांना पुरुष जातीचा कवठीसह पुर्ण सांगाडा आढळून आला. याची कल्पना त्यांनी मालक शहा यांना दिली. श्री शहा यांनी कळविल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पोलीस- पाटील पुजा रणजित पाटील यांच्यासह करवीर पोलीस ठाण्यात घटनेची वर्दी दिली.


घटनास्थळी करवीर पोलीस तातडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यावेळी डोक्याची कवटी, छातीची हाडे, दोन्ही हातांची व दोन्ही पायांची हाडे अस्ताव्यस्त पडलेली त्यांना दिसून आली. त्यानंतर करवीर पोलिसांनी सायंकाळी पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेतला आहे. सर्वसाधारण चार महिन्यापूर्वी या ठिकाणी ही बॉडी टाकली असल्याचे दिसून येत होते. गेल्या महिन्यात या परिसरातील गवती रानात वणवा लागला होता. त्यामुळे यापैकी काही हाडे जळून गेलेली असल्याचे यावेळी आढळून आले. तर प्राथमिक अंदाजानुसार घातपात किंवा आत्महत्या असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सांगाड्यावर कोणत्याही प्रकारचे मांस किंवा कपडे आढळलेली नाहीत असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बनसोडे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.ठाणे अंमलदार विजय गुरव व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -