भारतीय डाक विभागाच्या मेल मोटर सेवा विभागाकडून कुशल कारागीर पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
मेल मोटर सेवा कुशल कारागिरांच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ आहे. मेल मोटर सेवा भरतीसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया.
मेल मोटर सेवा भरतीसाठी पात्र उमेदवार त्यांचे अर्ज http://www.indiapost.gov.in
या अधिकृत वेबसाइटद्वारे करु शकतात. मेल मोटर सर्व्हिस मुंबई (इंडिया पोस्टल डिपार्टमेंट मुंबई) भरती बोर्ड, मुंबई यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीत एकूण १० रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही भरती केली जात आहे.
एकूण रिक्त पदे – १०
पदाचे नाव व रिक्त पदे पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव ट्रेड रिक्त पदे
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) ३
मोटर व्हेईकल इलेक्ट्रिशियन २
कुशल कारागीर वेल्डर १
टायरमन १
टिनस्मिथ १
पेंटर १
ब्लॅकस्मिथ १
शैक्षणिक पात्रता –
संबंधित विषयात ITI किंवा ८ वी पास आणि १ वर्षाचा अनुभव (मेकॅनिक पदासाठी जड वाहन चालक परवाना).
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरवात – ५ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मे २०२३ सायंकाळी ५ पर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई – 400018