Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा भूकंप? पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

राज्यात पुन्हा भूकंप? पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडीसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शाह यांना दिली आहे.

तर या दोन्ही भाजप नेत्यांनी दिल्लीत अमित शाह आणि जे पी नड्डा यांची घेतली भेट यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितिमध्ये अनेक घडामोडी घडत असताना दिसत आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडींचा आढावा शाह यांनी दोन्ही नेत्यांकडून जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते बैठका देखील घेणार असल्याची माहीती समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात अमित शाह लक्ष घालत असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -