Sunday, July 27, 2025
Homeक्रीडामॅचविनर Ajinkya rahane ला MS Dhoni आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध बाहेर बसवणार?

मॅचविनर Ajinkya rahane ला MS Dhoni आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध बाहेर बसवणार?


अंजिक्य रहाणे मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससाठी हिरो ठरला होता. पण कदाचित तो राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. अजून या बद्दल खात्रीलायक वृत्त नाहीय. पण असं झाल्यास, तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. अजिंक्यला बाहेर बसवण्यामागे कारण सुद्धा तसं आहे. त्यामुळे CSK ची टीम मॅनेजमेंट असं पाऊल उचलू शकते.असं कुठल कारण आहे, जे अजिंक्य रहाणेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मॅच खेळण्यापासून रोखतय. तो अनफिट आहे का? अजिबात नाही. तो आजारी आहे का? हे सुद्धा कारण नाहीय. मग काय आहे, जे अजिंक्यला राजस्थान विरुद्ध मॅच खेळण्यापासून रोखतय?

जाणून घेऊया, अजिंक्य रहाणेचा मार्ग रोखणारी ती चार कारणं. अजिंक्यने मुंबई इंडियन्सविरुद्ध 27 चेंडूत 61 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने त्यावेळी 19 चेंडूत आयपीएल 2023 मधील वेगवान अर्धशतक झळकवलं. याच सीजनमध्ये निकोलस पूरनने 15 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवून तो रेकॉर्ड तोडला.

आजारी नाही, दुखापत नाही, मग का बाहेर बसवू शकतात?

इतकी दमदार कामगिरी करुनही पुढच्या सामन्यात तुम्ही बाहेर कसं बसवू शकता? धोनी सुद्धा असं करणार नाही. पण राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्याच्यावेळी अशी चार कारणं आहेत, जी रहाणेच्या मार्गात बाधा आणू शकतात. ही चार कारणं म्हणजे राजस्थान रॉयल्सचे 4 बॉलर. त्यांच्याविरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट खूपच खराब आहे

रहाणेची ही आहे अडचण

T20 क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट खूप महत्त्वाचा असतो. IPL ला सुद्धा हाच नियम लागू होतो. IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रहाणेने 225 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. राजस्थानच्या 4 बॉलर्स विरोधात रहाणेचा हाच स्ट्राइक रेट पडतो व 100 च्या आस-पास येतो.


डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट विरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट 97.22 आहे. संदीप शर्मा विरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 92.20 आहे. अश्विन विरुद्ध 116.66 आहे. चहल विरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट 107.69 आहे. या 4 बॉलर्स विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये रहाणे 12 वेळा OUT झालाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -