गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वैशाख वणव्याचे चटके जाणवू लागले आहेत. तापमानात वाढ झाल्याने उष्मा जाणवू लागला आहे. कोल्हापुरातील तापमान 40 अंशावर गेल्याने दुपारच्या सत्रातील वर्दळीवरही त्याचा परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील अचानक बदल सातत्याने जाणवू लागले आहेत. सकाळ धुके, बोचरी थंडी दुपारी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी ढगाळ वातारवण होऊन तापमानात घसरण अशा विचित्र वातावरणाचा सामना करावा लागला आहे.
उष्णतेची लाट येण्याची शक्यता
दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तापमान 39 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात उष्णतेची लाट येण्याची आहे. तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
15 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता
दुसरीकडे, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.