Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाकोचच्या खुलाशाने CSK मध्ये खळबळ! धोनी पुढील सामन्यातुन बाहेर?

कोचच्या खुलाशाने CSK मध्ये खळबळ! धोनी पुढील सामन्यातुन बाहेर?

इंडियन प्रीमियर लीग 2023च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई संघाचा 3 धावांनी पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या सामन्याच्या निकालातून संघ सावरू होता पण चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आणखी एक धक्का दिला आहे.

चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला दुखापत झाली आहे. याचा खुलासा खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे. तो म्हणाला की संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनीला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पुढच्या काही सामन्यांमध्ये तो लंगडताना दिसला. मात्र, त्याने चेन्नईच्या चारही सामन्यांमध्ये तो खेळला आहे. पुढील सामन्यात तो खेळणार का हा प्रश्न पडला आहे.

धोनीबद्दल फ्लेमिंग काय म्हणाले?फ्लेमिंग म्हणाला की, धोनीला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे, जे तुम्ही त्याच्या काही हालचालींमध्ये पाहू शकता. या दुखापतीमुळे त्याला काही प्रमाणात अडचणी येत आहेत. तो स्पर्धा सुरू होण्याच्या अनेक महिने आधीच तयारी सुरू करतो. त्याने रांचीमध्ये नेट्समध्ये सराव केला आहेत. फ्लेमिंगने विश्वास व्यक्त केला की भारताचा माजी कर्णधार त्याच्या दुखापतीचा सामना करेल आणि संघाचे नेतृत्व करत राहील.

सीएसकेच्या जखमी खेळाडूंची संख्या वाढलीसीएसकेच्या जखमी खेळाडूंची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स टाचेच्या दुखापतीमुळे काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे, तर वेगवान गोलंदाज दीपक चहरला मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. दीपक संपूर्ण हंगामासाठी संघातून बाहेर असल्याचे मानले जात आहे. आता वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला दुखापत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -