Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाआज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने! विजयपथावर येण्याच्या निर्धाराने उतरणार मैदानात

आज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने! विजयपथावर येण्याच्या निर्धाराने उतरणार मैदानात

आयपीएलमध्ये आज (13 एप्रिल) पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असतील. या मोसमात दोन्ही संघ आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्याआधी संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गेल्या सामन्याला मुकला होता. आजच्या सामन्यात तो घरवापसी करेल. पांड्याच्या नेतृत्वात आज गुजरात विजयासाठी उतरेल. दुसरीकडे पंजाब संघातील स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन आज मैदानात उतरणार असल्याने पंजाबचा संघ आणखी मजबूत झाला आहे.

या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या पुनरागमनामुळे दोन्ही संघांना प्लेइंग 11 आणि खेळाडूंच्या रणनीतीमध्ये काही बदल करावे लागतील.

आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने जिंकले होते पण मागील सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत या सामन्यातून दोन्ही संघ विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्नात आहेत.

पंजाब किंग्स – प्रभसिमरन सिंग, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, सिकंदर रझा, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, जोशुआ लिटिल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -